Tuesday, March 6, 2012

एक सुंदर कविता ....

               " माझी नाव...."


माझी नाव... आत्ताच पाण्यावर चालायला लागली ...
वादलांचे घातपात अन लाटांचे प्रतिसाद ...सारंच सुरु झालं....
अधाराचे हात सोडत बंदर मागे मागे सरकत गेलं ...
अन मी निघालोय अस्तित्वं नसलेल्या वाटेवर , माझं अस्तित्वं शोधण्यासाठी ....!

लाटांसोबतचा एक मुक्काम संपला ,
वादळी स्वरांची नवी पहाट आता भयभीत होउन बोलायला लागली ...
माझी नाव...
आत्ताच पाण्यावर चालायला लागली ...

आता वार्यानही कुस बदलली ......लाटांच्या त्सुनामी झाल्या ...
समुद्र केविलवाणा होउन पाहतोय , निशाचर गाढ़ झोपेत अन
सर्वांना वाटतं माझी नाव बुडेल आता ...!
पण , तिला माहित आहे - मला पोह्ता येत नाही .
म्हणून तीही अस्तित्वहीन धावते आहे ...माझ्यासोबत ......


यानंतर कोलंबस कदाचित माझ्याच शोधत निघेल....
बिचारा ! त्याचे सातही खंड विसरलोय मी , आठवतय फ़क्त त्याचं गर्वगीत -
अखंड अमुची धेयासक्ती अखंड अन , आशा किनारा तुला पामराला ...!

म्हनुनच अजूनही मी प्रवाहाच्या विरोधात वल्हे मारीत ....
घेउन जातोय माझी नाव ....जी आता कुठे पाण्यावर चालायला लागली....


- कृष्णा बेलगावकर








No comments:

Post a Comment