Wednesday, April 18, 2012

उसलेल माझा समुद्र असा की....!



                                      उसलेल माझा समुद्र असा की....!


उसलेल माझा समुद्र असा की....!

उसलेल माझा समुद्र असा की
एक नाव तू धरून ठेव,
आठवनींच्या अभालात
एक गांव कोरुन ठेव.
जमेल  न  जमेल  पुन्हा शिडे  उभारण,
म्हणून काळजाचा  हात सहज  हातात  धरून ठेव. 
        किनाऱ्याचं  काय तो  तुटणारच असाही ,
        पण, तुटलेल्या लाटेचंही  एक घर करून ठेव.
        जखमांना सतावतिल वेदनांचे हिंसाचार  
        गुदमरलेल्या वादलांना  मी गेल्याचा अर्थ विचार.
मी येईलही  पुन्हा उसलत्या लाटांसोबत...
तोपर्यंत...,  पापण्यांतली  आसवे 
काळजावर  स्मरुण ठेव...!
उसलेल माझा समुद्र असा की
एक नाव तू धरून ठेव.....!
       
                         कृष्णा बेलगावकर
                                   


Tuesday, March 6, 2012

एक सुंदर कविता ....

               " माझी नाव...."


माझी नाव... आत्ताच पाण्यावर चालायला लागली ...
वादलांचे घातपात अन लाटांचे प्रतिसाद ...सारंच सुरु झालं....
अधाराचे हात सोडत बंदर मागे मागे सरकत गेलं ...
अन मी निघालोय अस्तित्वं नसलेल्या वाटेवर , माझं अस्तित्वं शोधण्यासाठी ....!

लाटांसोबतचा एक मुक्काम संपला ,
वादळी स्वरांची नवी पहाट आता भयभीत होउन बोलायला लागली ...
माझी नाव...
आत्ताच पाण्यावर चालायला लागली ...

आता वार्यानही कुस बदलली ......लाटांच्या त्सुनामी झाल्या ...
समुद्र केविलवाणा होउन पाहतोय , निशाचर गाढ़ झोपेत अन
सर्वांना वाटतं माझी नाव बुडेल आता ...!
पण , तिला माहित आहे - मला पोह्ता येत नाही .
म्हणून तीही अस्तित्वहीन धावते आहे ...माझ्यासोबत ......


यानंतर कोलंबस कदाचित माझ्याच शोधत निघेल....
बिचारा ! त्याचे सातही खंड विसरलोय मी , आठवतय फ़क्त त्याचं गर्वगीत -
अखंड अमुची धेयासक्ती अखंड अन , आशा किनारा तुला पामराला ...!

म्हनुनच अजूनही मी प्रवाहाच्या विरोधात वल्हे मारीत ....
घेउन जातोय माझी नाव ....जी आता कुठे पाण्यावर चालायला लागली....


- कृष्णा बेलगावकर








Saturday, August 22, 2009

पापण्याना चोरून येथे...

पापण्याना चोरून येथे..
चंद्र हा डोकावतो..
तू पहाटे स्पर्षवेडा
स्वप्नात या झेपावतो
तुझ्या रुपे अंगणात माझ्या
आभाळ सांडलेले
थरथरलेरे मनातुनी
हे खेळ मांडलेले..
स्पर्शातुनी चांदन्याच्या
गंध तुझा वेडावतो ..
पापण्याना चोरून येथे...
थरथरणारे अंग तुझे अन
फडफडणारे काळीज माझे
बोबडे रे शब्द आणि
प्रणयाचे सुर ताजे
पहाटवेळी स्वप्नात वेडया
सारखा तू सतावातो
पापण्याना चोरून येथे...
चंद्र हा डोकावतो॥
- कृष्णा बेलगावकर

माझी लाडकी कविता ....!

         गांव
चोहिकडे आभाळ हे
तुझे तुटकेच आहे
दुरावली माणसे अन
गांव एकटेच आहे
आता पुन्हा उराशी
खेलुन डाव ताजे
वाहिलेल्या जखमांचे
वाढू नको रे ओझे
सांदल्या भेगा मनाच्या
अन काळीज फाटकेच आहे...
चोहिकडे आभाळ हे..
निजतो कसा पाहुनी तू
कोरीव बांध सारे
बंदिस्त मानसांचे
घरटे मानत कोरे
भिंती सुखी घराच्या
अन चौकटीना चट्केच आहे
चोहिकडे आभाळ हे तुझे
तुटकेच आहे
दुरावली माणसे अन
....गांव एकटेच आहे ...
- कृष्णा बेलगांवकर